केंद्र सरकारची या रेल्वेमार्गाला मंजुरी : दोन धार्मिक स्थळ एकत्र

Share this post

पुणे : केंद्र सरकारने पुणे ते नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पातील पुणतांबा ते शिर्डी या १६.५० किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मार्गिकेसाठी २३९.८० कोटी रुपये खर्चास बुधवारी मान्यता दिली. त्यामुळे पुणे ते नाशिक रेल्वे मार्गिका प्रकल्प ‘हाय स्पीड’ ऐवजी ‘सेमी हायस्पीड’ होणार असल्याचे निश्चित झाले आहे. पुणे ते नाशिक ‘हाय स्पीड’ रेल्वे मार्गिका प्रकल्पांतर्गत खोडद गावातील ‘जायंट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) हा जागतिक दुर्बीण संशोधन प्रकल्प अडथळा ठरत असल्याने रेल्वेमंत्री वैष्णव यांनी पुणे-अहिल्यानगर- शिर्डी-नाशिक या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. समांतर मार्गात पुणतांबा ते शिर्डी हा १६.५० किलोमीटर लांबीच्या मार्गाचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या मार्गिका प्रकल्पाच्या ‘डीपीआर’ चे काम पूर्ण झाले असून, किरकोळ त्रुटी दूर करून रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते.

Rohit Rao
Author: Rohit Rao

Leave a Comment

ख़ास ख़बरें

ताजातरीन

marketmystique