आळंदी : आळंदीमध्ये वाहतूक पोलिसांवर दगड घेऊन मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. या घटने प्रकरणे अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आळंदीमध्ये नेहमीच वाहतूक कोंडी होते. यामुळे वाहतूक पोलिसांसोबत रिक्षा चालकांची हुज्जत ही नवीन बाब नाही. अज्ञात रिक्षाचालक आणि आळंदी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांच्यात वाद झाले. सतीश नांदुरकर यांना रिक्षा चालकाने दगडाने मारण्याचा प्रयत्न केला. हे व्हिडिओमधून समोर आल आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
