मुंबई : बेकायदेशीररित्या चालविण्यात येणाऱ्या बाईक टॅ्क्सीविरोधात मुंबई महानगर क्षेत्रातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील २० वायुवेग पथकांमार्फत एकाचवेळी मुंबई, ठाणे, वसई, वाशी, पनवेल येथे धडक मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान अवैधरित्या चालणाऱ्या ९३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ८५ वाहने (बाईक टॅक्सी) अटकावून ठेवण्यात आली आहेत व अवैध अॅग्रीगेटरविरुध्द फौजदारी गुन्हे नोंदविण्याची कार्यवाही सुरु आहे. मुंबई महानगरात अॅपच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याच्या तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयात प्राप्त झाल्या आहेत.
